
नांदगाव/ वार्ताहर : नांदगाव तिठा येथील सेवा मार्गावरील स्टॉल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले.आपल्या हद्दीत झालेले अतिक्रमण शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात व राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थित हटविण्यास सुरवात केली.व्यापारी व अधिकारी यांच्यात जोरदार चर्चा कायम आहे.
यासाठी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण यांच्याकडून हायवे बाधित जागेत अतिक्रमण केलेल्या नागरिकांना नोटीस बजावण्यात आले असता अतिक्रमण न हटविल्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात ठेऊन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटणचे अभियंता अतुल शिवनिवार, सहा. अभियंता बी.जी. कुमावत याच्या उपस्थित संबंधित नागरीकांकडून करण्यात आलेली अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली.मात्र व्यापारी व अधिकारी यांच्यात जोरदार चर्चा काही संपत नव्हती.











