देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जयंती

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयात आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम आयोजित केला.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव म्हणाल्या की, इतिहासात डोकावून सनावळी मांडावी आणि इतिहासातून समाज समजून घ्यावा. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समाजासाठी दिलेले योगदान बहुमोल आहे. त्यांच्या विचारांचे आजच्या काळातही महत्व टिकून आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सुरवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर इतिहास विभागप्रमुख प्रा. मंदार बेटकर यांनी प्रास्ताविक करत महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग आणि विचार तरुण विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, कला शाखा प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश्वरी नांदगावकर (प्रथम वर्ष कला) हिने केले. आर्या पावरी (प्रथम वर्ष कला) हिने आभार मानले.