दोडामार्ग | सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंच आणि शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने संघटना वाढीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून पक्षाची ताकद वाढवण्यावर या वेळी भर देण्यात आला.
नगरपंचायत निवडणुकीचे रणशिंग
दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याबाबत या बैठकीत एकमत झाले. निवडणुकीच्या रणनीतीबाबत निलेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, निवडणुकीच्या दृष्टीने प्रभागांमधील कामांचे नियोजन आणि जनसंपर्क वाढवण्याबाबत आवश्यक सूचना या वेळी देण्यात आल्या. या बैठकीमुळे दोडामार्ग तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख संजू परब,विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई,उपजिल्हा राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी गोपाळ गवस, जिल्हा परिषद सदस्या सौ. तळवणेकर तालुका प्रमुख तथा उपसभापती गणेशप्रसाद गवस,पचायत समिती सदस्या सौ. सायली निबाळकर, नेहा गवस,सरपच संघठना अध्यक्ष अनिल शेटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते












