आमदार निलेश राणे यांनी कट्टा बाजारपेठ येथील हनुमान मंदिरात घेतले दर्शन

हनुमान मित्रमंडळ बाजारपेठ कट्टा यांच्यावतीने सरपंच शेखर पेणकर यांच्या हस्ते आमदार निलेश राणे यांचा सत्कार

अमित खोत | मालवण : मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठया उत्साहात पार पडला. आमदार निलेश राणे यांनी या उत्सवात सहभागी होत हनुमंताचे दर्शन घेतले.

 

यावेळी हनुमान मित्रमंडळ बाजारपेठ कट्टा यांच्यावतीने सरपंच शेखर पेणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, उपसरपंच आबा कामतेकर, शेखर मसुरकर, सागर माळवदे, अण्णा कुबल, दिनेश राऊळ, ऋषी पेणकर, राजू सावंत व हनुमान मित्रमंडळचे कार्यकर्ते उपस्थित होते.