कमर्शियल गॅस सिलेंडर पुरवठ्यासाठी आचरा व्यापा-यांचे तहसीलदार यांना निवेदन

आचरा–अर्जुन बापर्डेकर

गेले काही दिवस कमर्शियल सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल व्यवसाय खानावळ तसेच कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून असलेले व्यवसाय बंद झाले आहेत . याबाबत आचरा व्यापारी संघटनेच्या माध्यमातून हाॅटेल व्यावसायिक एकत्र येत तातडीने व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे द्वारे केली.तसेच दोन्ही गॅस एजन्सीनाही निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी आदर्श व्यापारी संघटना आचराचे उपाध्यक्ष मंदार सांबारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि हाँटेल राणेशाहीचे महेश राणे,
आचरा माजी सरपंच व हाँटेल व्यावसायिक मंगेश टेमकर, प्रफुल्ल नलावडे,माणिक राणे, संदीप पांगम, प्रसाद कावले , सुरेंद्र कुबल,विकास साटम, तुषार परब,पुजारे यांसह अन्य व्यापारी बांधव उपस्थित होते. या निवेदनात
आचरा हे पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेले गाव असून आर्थिक दृष्ट्या येथील लोक पर्यटन व त्या अनुषंगाने चालणाऱ्या व्यवसायांवर अवलंबून आहेत .येथील व्यवसाय हा ठराविक काळापूरताच मर्यादित आहे . त्यामुळे ऐन सीजन वेळीच व्यवसायात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे याचा विपरीत परिणाम येथील स्थानिक उद्योगधंद्यांवर होत आहे. उद्योगधंदे आर्थिक अडचणीत आले आहेत मालवण ला जाऊन सुद्धा आपल्या संबंधित कार्यालयात वारंवार फेरफटका मारून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे याचा नाहक आर्थिक व मानसिक त्रास व्यावसायिकांना सोसावं लागत आहे आपल्याकडे साठा उपलब्ध असला तरी व्यावसायिकांना मिळत नाही असे निदर्शनास येत आहे तरी आम्ही आपल्याला विनंती करतो की व्यावसायिक सिलेंडरच्या बाबत योग्य नियोजन करत आचरा येथील व्यापाऱ्यांना कमर्शियल सिलेंडर तत्काळ उपलब्ध करून मिळावा असे न झाल्यास याचा विपरीत परिणाम आचरा येथील व्यवसायांवर होणार आहे व्यावसायिक सिलेंडरची मागणी पूर्ण न झाल्यास व्यावसायिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल तसेच होणाऱ्या गंभीर परिणाम आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असे स्पष्ट करण्यात आले आहे.