लांजा (प्रतिनिधी) मेंगलोर विद्यापीठ मेंगलोर पूर्णप्रांजा महाविद्यालय उडपी येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पुरुष गट खो-खो स्पर्धेमध्ये लांजा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले.
सदर अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पुरुष गट खो-खो स्पर्धेमध्ये श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजा मधील विद्यार्थी कर्णधार आकाश कदम, आदित्य कांबळे, संकेत जाधव यांनी
मुंबई विद्यापीठाच्या संघामधून खेळताना रौप्य पदक पटकावले
मेंगलोर विद्यापीठ मेंगलोर पूर्णप्रांजा महाविद्यालय उडपी या ठिकाणी ही स्पर्धा नुकतीच पार पडली. तीनही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










