रत्नागिरी l प्रतिनिधी : हळदीच्या कार्यक्रमातील किरकोळ कारणातून दांम्पत्याला तिघांनी मारहाण केली.ही घटना शनिवार 23 डिसेंबर रोजी दुपारी 1 वा.जुनी तांबट आळी येथे घडली. तीन संशयितांविरोधात मिलिंद मधुकर सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवारी ते पत्न्ाी आणि मुलीसह तांबटआळी येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते.दुपारी 1 वा.हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी जमलेल्या लोकांना कार्यक्रम संपलेला असून तुम्ही आता आपआपल्या घरी जा असे सांगितले.याचा राग आल्याने तिन्ही संशयितांनी मिलिंद सावंत यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने त्यांच्या डोक्यात आणि चेहर्यावर मारुन दुखापत केली.तसेच त्यांची ज्युपीटर दुचाकीवर दगड मारत नुकसान केले.दरम्यान,मिलिंद सावंत यांची पत्नी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेली असता तिच्याही कानाखाली हातांच्या थापटांनी मारहाण करत तिला ढकलून खाली पाडले.याप्रकरणी संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 324,323,504,506,34,427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











