सावंतवाडी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अटल प्रतिष्ठानच्या माठेवाडा येथील प्रशासकीय कार्यालयात जिजाऊ वाचनालय आणि अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चर्चा करण्यात आली.
अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, “बाबासाहेबांनी देशाला संविधानाच्या रूपात दिलेला अनमोल दस्तऐवज आहे. यामुळेच भारताचे सार्वभौमत्व टिकून आहे. वर्षानुवर्षे जातीयतेच्या विळख्यात सापडलेला दलित समाज आज ताठ मानेने मुख्य प्रवाहात वावरत आहे, याचे खरे श्रेय भारतरत्न बाबासाहेबांना जाते.”
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक दळवी, अटल प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीकांत राऊळ, प्रेरणादायी व्याख्याते प्रा. रूपेश पाटील, अटलच्या विश्वस्त श्रीमती अर्पिता वाटवे, महादेव लिंगवत, समुपदेशक कु. तृप्ती धुरी, कार्यालयीन व्यवस्थापिका कु. ज्योती राऊळ, सौ. तृप्ती पार्सेकर, जिजाऊ वाचनालयाचे विश्वनाथ सनाम, मंगेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते











