सावंतवाडी : येथील राजा शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंडळाचे सल्लागार तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड.अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक विलास जाधव, उमेश कोरगावकर, सुरेश भोगटे,
सौ.दिपाली भालेकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद रासम, गेगरी डाँटस, रवींद्र राऊळ, रत्नाकर माळी, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, विजय पवार, सचिव दीपक सावंत, रवी जाधव लक्ष्मण कदम अरुण वाडकर
किशोर जाधव उत्तम जाधव
ममता जाधव नंदकिशोर जाधव
भारती जाधव एकता जाधव
यश जाधव आदी उपस्थित होते.
मंडळाने या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मंडळाचा सामाजिक दृष्टिकोन:
मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर यांच्या पुढाकारातून हे सामाजिक उपक्रम राबवले जातात. मंडळाचा सामाजिक दृष्टिकोन या उपक्रमांमधून दिसून येतो.
Home सिंधुदुर्ग सावंतवाडी राजा शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी









