खेड शरद पवार राष्ट्रवादीचे ‘सार्वजनिक बांधकाम’ला निवेदन

खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील आंबवली-सुकिवली मार्गावरील मुख्य रस्त्याच्या पुलाखाली सातत्याने अपघात घडत असून जीवितहानीसह आर्थिक हानी व वाहनांचे नुकसानही होत आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला गतिरोधक टाकावेत, यासाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतर्फे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता आशा जटाळ यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष विनायक निकम, शहरप्रमुख मंगेश भागवत, फैयाज मणियार, तालुका महिला उपाध्यक्षा प्रियंका चव्हाण, महिला सचिव राजश्री चव्हाण, सुजाता पालकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.