अजित दादा पवार यांच्या संदर्भातील दुःखद बातमीच्या पार्श्वभूमीवर खेड व्यापारी संघटनेचे बंदचे आवाहन

खेड (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खेड शहरात शोककळा पसरली आहे. या अत्यंत दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर खेड शहर व्यापारी संघटनेने आज मंगळवार, दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजल्यानंतर आपापली सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
खेड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद भाई बुटाला यांनी ही माहिती देत, या घटनेप्रती तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अजित दादा पवार हे राज्याच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारे नेतृत्व होते. त्यांच्या संदर्भातील ही बातमी मन सुन्न करणारी असून, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने बंद पाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या आवाहनाला खेड शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून, संपूर्ण शहरात शोकमय वातावरण आहे. दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत माहिती व पुढील तपशीलांची प्रतीक्षा करण्यात येत आहे.