सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन; उद्यमनगर येथे एकावर कारवाई

रत्नागिरी ः प्रतिनिधी : सार्वजनिक ठिकाणी दारुचे सेवन करणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शुक्रवार 26 मे रोजी रात्री 8.30 वा.उद्यमनगर येथील वुमन्स हॉस्टेलजवळील उघड्या जागेत करण्यात आली.
जिशान सर्फराज शेख (20,रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.शुक्रवारी शहर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना उद्यमनगर येथील वुमन्स हॉस्टेलजवळील मोकळ्या जागेत जिशान आपल्या पुढयात बियरची बाटली घेउन पिण्यासाठी बसलेला दिसून आला होता.त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.