दापोली l प्रतिनिधी: दापोली तालुक्यातील माटवण येथे पंचक्रोशी प्रिमियर लिग उत्साहापूर्वक वातावरणात संपन्न झाली. एकूण 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये पृथ्वीचा संघमालक – संजय महाडिक व विज्ञान महाडिक, अथांगचा संघमालक – स्वप्नील सुरेश महाडिक, मंथन फायटर्सचा संघमालक – संकेश जाधव, महामाई कृपाचा संघमालक – अमित मुरचवडे व अरुण नलावडे, एस आर फायटर्सचा संघमालक रोशन मोरे, करजाई कालकाई संघमालक – अजय शेलार, लायन किंग – संघमालक जयेश माटवणकर, दोस्ती संघमालक एकनाथ मुरचवडे हे संघमालकांचे संघ होते, तर प्रथम क्रमांक मंथन फायटर्स, द्वितीय क्रमांक महामाई कृपा, तृतीय क्रमांक करजाई कालकाई-सलील मर्चंडे व विनोद महाडिक यांच्या संकल्पनेतून सदर स्पर्धा पंचक्रोशी क्रिकेट प्रेमीच्या आयोजनाने उत्सहात पार पडली. तर शहिद कॅप्टन नितीन प्रकाश चव्हाण यांचे पिता श्री प्रकाश परशुराम चव्हाण व आई सौ चव्हाण मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर स्पर्धेला पंच म्हणून श्री महेंद्र शिंदे व रविकांत जाधव, समलोचक म्हणून दत्तात्रय क्षीरसागर व तेजस पवार यांनी कामगिरी पार पाडली. पंचक्रोशी मधील अनेक दानशूर व्यक्तींनी देणगी स्वरूपात मोठया प्रमाणात सहकार्य केले. तसेच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुशांत पवार, स्वप्नील महाडिक, मंगेश मेस्त्री, अनिकेत घोसाळकर, पंकज फुरुस्कर, साहिल गमरे, दिपक मेस्त्री, महेश देवळेकर, संदीप कोशिमकर, संकेत कोशिमकर, ओमकार महाडिक, नितीन शेलार, अक्षय महाडिक, सुबोध साळवी, नितीन महाडिक, राजेश दळवी, चंद्रकांत विचारे, दिपक शिंदे, निलेश पवार, संजय महाडिक, अभिजित घोसाळकर, रुपेश सावंत, विशाल शेलार, जयंत देसाई, प्रशांत फुरुस्कर, मंगेश मर्चंडे, अजय मर्चंडे, बावा पवार, ऋतुराज सुतार, सतीश मोरे, सुरेश जाधव, रुपेश जाधव, मंगेश पवार, सुरेश गमरे, सार्थक मोरे आदींनी खूप मेहनत घेतली.












