रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील गोळप-शिरंबाडवाडी येथे अति दारु सेवन केल्यामुळे प्रौढाचा मृत्यू झाला.याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून ही घटना 25 मे रोत्री सकाळी 10 ते 27 मे रोजी सायंकाळी 7.30 वा.कालावधीत घडली आहे.
गणेश अनंत सुवरे (51,रा.शिरबांडवाडी गोळप,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.याबाबत त्यांच्या मुलाने पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यानूसार,गणेश सुवरे यांना दारुचे व्यसन होते.रोजच्या दारुच्या सेवनामुळे ते कोठेही पडून असायचे व दारु उतरल्यावर एक दोन दिवसांनी घरी यायचे.गुरुवार 25 मे रोजी सकाळी 10 वा.गणेश सुवरे असेच घरातून निघून गेले होते.सवयीप्रमाणे ते दारु उतरल्यावर घरी येतील असा घरातल्यांनी अंदाज बांधला होता.परंतू,27 मे शनिवार रोजी सायंकाळी 7.30 वा.गणेश सुवरे यांचा मृतदेह गोळप शिरंबारवाडी येथे मिळून आला.याप्रकरणी पूर्णगड पोलिस अधिक तपास करत आहेत.











