खेड(प्रतिनिधी)महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह २० ते २७ एप्रिल २०२५ रोजी श्री रायगड पुत्र आकाश महाराज भोंडवे यांनी केलं आहे,या सप्तहा निमित्ताने शिवरायांचा कीर्तीचा जागर होणार आहे
या कार्यक्रम ला महाड तालुक्यातील नामदार भरतशेठ गोगावले ( रोजगार हमी, फलोत्पादन, खरभुमी मंत्री) यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम होणार आहे,
या अखंड हरिनाम सप्ताहचा प्रारंभ, किल्ले श्री रायगड पायथा (हिरकणीवाडी) येथे होणार आहे. सायंकाळी हरिनाम कीर्तन २० एप्रिल २०२५ रोजी ह. भ.प.अक्षराताई शेकोकार वय वर्ष १३(बुलढाणा) यांचं कीर्तन, सोमवार २१ एप्रिल २०२५ रोजी ह.भ.प. विनीत न. पाटील वय वर्ष १३ जालना यांचं कीर्तन, मंगळवार दि २२ एप्रिल २०२५ रोजी ह.भ.प. अंजलीताई गाडे वय वर्ष ८ (जालना) यांचं कीर्तन, बुधवार दि २३ एप्रिल २०२५ रोजी ह.भ.प.अर्जुन म.शेलार (शिवचित्रकार) यांचं कीर्तन,गुरुवार दि २४ एप्रिल २०२५ ह.भ.प.गुरुवर्य वामन म.भोईर(मानवसेवारत्न व रायगड भूषण)यांचं कीर्तन,शुक्रवार दि २५ एप्रिल २०२५ रोजी गुरुदेव म.चव्हाण ह.भ.प. (कोपरगांव) यांचं कीर्तन,शनिवारी दि २६ एप्रिल २०२५ रोजी ह.भ.प.अक्षय म.भोसले ( आध्यात्मिक आघाडी प्रदेशाअध्यक्ष शिवसेना)यांचं कीर्तन, २७ एप्रिल २०२५ रोजी ह.भ.प.धर्मभूषण लक्ष्मण म.पाटील(आळंदी देवाची)यांचे कीर्तन होणार आहेत,तसेच बालसंस्कार शिबीर २०ते २६ एप्रिल पर्यंत छत्रपती संभाजीराजे वारकरी गुरुकुल आळंदी आयोजित व सकाळी ८ ते ११ शिवकालीन शास्त्र प्रशिक्षण शिबीर,२६ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या स्क्रीनवर छावा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे,अशी माहिती युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी दिली








