सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे १९ रोजी आयोजन

सावंतवाडी: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा शनिवार १९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर बहुउद्देशीय सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. या सोहळ्यामध्ये केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्यासह गोवा राज्याचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेले विविध आदर्श पत्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय आणि अतुलनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार दीपक केसरकर, आमदार जीत आरोलकर, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब, यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापिका अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत-भोसले, कार्यकारी अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव बाळ खडपकर, खजिनदार ॲड. संतोष सावंत, मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी गणेश जेठे आणि सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, जिल्हा डिजिटल मीडिया सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपअभियंता वैभव सगरे, सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, मुख्याधिकारी सौ. अश्विनी पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी, युवा उद्योजक उदय भोसले, माजी पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ, माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, ज्येष्ठ नेते सुरेश गवस आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात खालील पुरस्कार प्रदान केले जातील:
* नागेश पाटील: वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार
* अवधूत पोईपकर: कै. जयानंद मठकर पुरस्कार (ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार)
* महादेव परांजपे: कै. पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार
* प्रवीण परब (नाट्यकर्मी): कै. बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार
* श्री विश्वनाथ नाईक: आदर्श समाजसेवक कै. चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार
* अजित दळवी (ज्येष्ठ छायाचित्रकार): कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे स्मरणार्थ छायाचित्रकार पुरस्कार

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत डॉ. गिरीश कुमार चौगुले, डॉ. विनया बाड, उदय भोसले, ॲड. संदीप निंबाळकर, सागर चव्हाण, सचिन रेडकर यांच्यासह सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर आणि कै. प्रवीण मांजरेकर यांचा समावेश होता.
या महत्त्वपूर्ण पुरस्कार वितरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर आणि खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे