खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या कळंबणी – गावडेवाडी फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या दत्ताराम कृष्णा देवघरकर ( वय-८०, रा-कळंबणी सुतारवाडी, ता. खेड) या वृद्धाला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला.
हि दुर्घटना दि. २२ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४:१५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची खबर मयताचे नातू विकी एकनाथ देवघरकर (वय-२३) यांनी येथील पोलिस स्थानकात दिल्यानुसार पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.










