लांजा (प्रतिनिधी) कॉलेज परिसर रहिवासी संघाच्या वतीने आयोजित स्नेहसंमेलन, सत्कार समारंभ आणि सत्यनारायण पूजा असा संयुक्त कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या निमित्ताने घरकाम करणाऱ्या महिला भगिनींचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.
आपण ज्या परिसरात राहतो तेथील समस्या सोडविणे आणि सेवा सुविधांसाठी पाठपुरावा करणे या उद्देशाने येथील रहिवाशांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून एकत्र ग्रुप करून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्यास सोपे होत होते कॉलेज परिसरातील भाई चौगुले, दिनेश झोरे, मुबारक शेख,मंगेश मोरे, बळवंत शिंदे,,देवळेकर व वासंती संकुल मधील सूर्यकांत गव्हाणकर नचिकेत शेट्ये, जयेश शेट्ये या सर्वांनी एकत्र येऊन कॉलेज परिसरातील रस्ते पाणी गटार या सुख सुविधांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आणि सर्वांच्या सहमतीने कॉलेज परिसर रहिवासी संघाची स्थापना करण्यात आली. अध्यक्षपदी दिनेश झोरे यांची निवड करण्यात आली.
कॉलेज परिसर रहिवासी संघाच्या वतीने दिनांक २४ एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मुलांचे फनी गेम्स, परिसरातील गुणवंत व्यक्ती, गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा तसेच घरेलू काम करणाऱ्या महिला भगिनी यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे लांजा नं ५ व वनगुळे शाळेचे नासा /इसरो मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिका सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी भविष्यात या ठिकाणी मंडळाने वाचनालय सुरू करावे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष भाषणात दिनेश झोरे यांनी भविष्यात हे मंडळ सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष दिनेश झोरे यांच्यासह दिनेश चाल्लावाड, श्री साखळकर, श्री प्रभू देसाई, शुभम चव्हाण ,नचिकेत शेट्ये, जयेश शेट्ये सूर्यकांत गवाणकर, मंडळाचे आधारस्तंभ भाई चौगुले तसेच महिला भगिनी, मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली आहे.











