जमिन जागेच्या वादातून प्रौढाने चुलत भावाला केली बेदम मारहाण
रत्नागिरी ः प्रतिनिधी
जमिन जागेच्या वादातून तंटामुक्ती समितीच्या कार्यालयातच चुलत भावाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार 26 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वा. सुमारास गडनरळ ग्रामपंचायत येथे घडली.
राजेश हरिश्चंद्र मेढेकर (42,रा.कोळीसरे मेढेकरवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात संतोष पांडूरंग मेढेकर (45,रा.कोळीसरे मेढेकरवाडी,रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, हे दोघेही नात्याने चुलत भाउ आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून जमिन जागेवरुन वाद-विवाद सुरु आहेत. आपला जागचा वाद मिटवण्यासाठी ते तंटामुक्ती समितीकडे मिटिंगसाठी गेले होते. त्यावेळी तेथेही त्यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर राजेशने संतोषला हातांच्या थापटांनी मारहाण करत त्याच्या मानेला आणि पाठीला जोराचा चावा घेत तुला बघून घेईन अशी धमकि दिली. यापकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.











