मिरजोळे-नाखरेकरवाडी येथे मुलाने आई आणि चुलत काकावर कोयत्याने केले वार 

रत्नागिरी : प्रतिनिधी

अज्ञात कारणातून आई आणि चुलत काकावर कोयत्याने मारहाण करत त्यांना जखमी केले. ही घटना शुक्रवार 25 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास मिरजोळे-नाखरेकरवाडी येथे घडली.

अभिषेक विजय नाखरेकर (29, रा. मिरजोळे नाखरेकरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर या हलल्यात विशाखा विजय नाखरेकर आणि जयवंत बारक्या नाखरेकर (दोन्ही रा. मिरजोळे नाखरेकरवाडी, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी संशयिताचे वडिल विजय जगन्नाथ नाखरेकर (60, रा. मिरजोळे नाखरेकरवाडी, रत्नागिरी) शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी ते आणि त्यांचा मोठा मुलगा ओंकार हे आंबा पेट्या भरण्याचे काम करत होते. तेव्हा अभिषेक तिथे आला. त्याने घराच्या जिन्याजवळ आंबा पेट्यांचे गवत कापण्यासाठी ठेवलेला कोयता हातात घेतला. त्यानंतर घरात जाउन आई विशाखा आणि चुलत काका जयवंत नाखरेकर यांच्यवर कोयत्याने मारहाण करुन दुखापत केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.