मंडणगड | प्रतिनिधी:
यशतेज फाउंडेशन (संस्थापक – ॲड.यश घोसलकर) यांच्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मंडणगड येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
उद्घाटन समारंभ
या स्पर्धेचे उद्घाटन श्री.विशाल जाधव (गटविकास अधिकारी, मंडणगड)-BDO, श्री.अक्षय ढाकणे (तहसीलदार, मंडणगड), श्री.अभिजीत कुंभार (मुख्याधिकारी, नगरपंचायत मंडणगड), श्री. नितीन गवारे (पोलीस निरीक्षक, मंडणगड), श्री. एन. के. शिंदे (गटशिक्षण अधिकारी, मंडणगड), डॉ. श्री. विकास शेटे, ॲड.श्रीकांत जाधव , ॲड. अरुण ढंग, श्री. राम राठोड, श्री. राजेश इंगळे व श्री. दिनेश सापटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
स्पर्धेतील प्रमुख अधिकारी:
बुद्धिबळ मुख्य ऑर्बिटर म्हणून विनायक माने, सह ऑर्बिटर म्हणून श्रेया सोनकर आणि कल्पेश लिमये यांनी स्पर्धेचे यशस्वी संचालन केले.
स्पर्धेतील सहभाग:
या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण १२७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विविध वयोगटांतील विजेते पुढीलप्रमाणे:
८ वर्षाखालील गट:
१ले – संभाजी निखिल पिंपळे
२रे – स्वस्तिक रुपेश पवार
३रे – शिवराज प्रवीण काळे
१० वर्षाखालील गट:
१ले – विपुल क्रांतीदूत फडके
२रे – शिव समीर गवस
३रे – सानिस सागर बुटाला
१२ वर्षाखालील गट:
१ली – समृद्धी सतीश खैरे
२रे – गुरुराज रोहित दळवी
३रे – साईराज तुकाराम थोरात
१४ वर्षाखालील गट:
१ला – हर्ष गणेश चव्हाण
२रा – युवराज सुशील देवघरकर
३रा – शौर्य समीर गवस
१६ वर्षाखालील गट:
१ला – वेद कमलाकर कांबळे
२रा – प्रीत ललित जैन
३रा – मयूर मंगेश गणवे
विशेष उल्लेखनीय कामगिरी:
दापोली, खेड व मंडणगडचे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत शानदार कामगिरी करत भरघोस यश संपादन केले.
गौरव आणि बक्षीस वितरण:
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भारताचे ग्रँड मास्टर व इंडिया लेडीज टीमचे कोच श्री अभिजीत कुंटे यांनीदेखील स्वतःहून एक व्हिडिओ बनवून एस एस फाउंडेशनच्या कामगिरीचे अभिनंदन केले तसेच श्री श्रीराम खैरे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी यांनी देखील अभिनंदन आचा स्वतःचा व्हिडिओ पाठवून यशतेज फाउंडेशनचे कौतुक केले आणि यशतेज फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.











