खेड(प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्याच्या पोलादपूर बाजूकडील कायमस्वरुपी वीजपुरवठा कार्यान्वित झाला आहे. रत्नागिरी बाजूकडील वीजपुरवठा येत्या १०-१५ दिवसातच पूर्वपत होईल दोन्ही बोगद्याबाहेरील मार्गावर २०० पथदीपांची उभारणीही करण्यात येणार आहे. बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. १५ में पूर्वी दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने खुली होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यानी दिली.
सुट्टी हंगामात चाकरमान्यांचा प्रयास होणार वेगवान मे महिन्याच्या सुट्टी हगामात गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. सणांच्या कालावधीत चाकरमान्यांनी बोगद्यातूनच सफर करण्यास सर्वाधिक पसंती दिली होती. १५ में पूर्वी पूर्ण क्षमतेने बोगद्या वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्रयत्नशील असल्याने सुट्टी हंगामात चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी अन् सुस्साट होणार आहे. यामुळे चाकरमानी सुखावले आहेत.
येत्या १०-१५ दिवसात बोगद्यात २४ तास वीजपुरवठा कार्यान्वित होणार असल्याने प्रवाशांची चित्ता कायमची मिटणार आहे. ऐन उन्हाळ्यत दोन्ही बोगद्यात लागलेली गळती थांबवण्यासाठी पुन्हा ग्राऊंटींगचा अवलंब करण्यात येणार आहे. हे काम देखील हाती घेण्यात आले असून लवकरच गळती थांबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही बोगद्यातील मार्गावर दोन्ही बाजूला २०० पथदीपांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी विद्युत खांबासह आवश्यक ती यंत्र सा मुग्रीही उपलब्ध झाली आहे. एक, दोन दिवसातच पथदीपांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांथा अवधी लागण्याची शवयता आहे.
१५ मे पूर्वी दीन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक खुली करण्याच्या दृष्टीने प्रपत्न करण्यात येणार असल्याचेही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले












