वेंगुर्ले l दाजी नाईक :शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सागरी सुरक्षा कवच अभियान अंतर्गत वेंगुर्ले पोलीस स्थानकाच्या वतीने या अभियानाचा वेंगुर्ले बंदर येथून शुभारंभ करण्यात आला. वेंगुर्ले
पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले तालुक्यातील सर्वच सागरी किनारी, बीच येथे भेट देऊन पाहणी करण्यात आली. तसेच सुरक्षे संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानात पोलीस निरीक्षक संदीप भोसले, एपीआय सागर खंडागळे, विद्या जाधव, पीएसआय शेखर दाभोलकर आदींच्या पथकाने भेट दिली व सागरी सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी संबंधित ठिकाणचे सागरीरक्षक, वॉर्डन उपस्थित होते, त्यांना सागरी सुरक्षा संदर्भात सूचना देण्यात आल्या. वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ, लाईट हाऊस, वेंगुर्ला बंदर, नवाबाग, सागरेश्वर, आरवली, वेळागर बीच, रेडी पोर्ट, रेडी यशवंतगड, रेडी चेक पोस्ट, कोंडुरा वायंगणी इत्यादी ठिकाणी पथकाच्या वतीने भेट देण्यात आली.
हे अभियान मंगळवार सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीपर्यंत चालणार आहे.











