सुदैवाने जिवितहानी नाही; खेडच्या अग्निशामक दलाला आग विझविण्यात आले यश
खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील मंडणगड मार्गावरील धामणी गावाजवळ भरणे येथुन कडाप्पा मार्बलचा माल माटवण येथे घेऊन जाणारा पिकअप टेंम्पोला अचानक आग लागल्याने टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हि लागलेली आग विझविण्यात खेड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला यश आले. हि घटना मंगळवारी दुपारी ११ : ५० वाजता घडली.
खेड नपाच्या अग्निशामक दलाला माहीती मिळताच अग्निशामक दलाचा बंब आणि नगरपरिषद अग्निशमन कर्मचारी फायरमन- श्याम देवळेकर, फायरमन- दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन- प्रणय रसाळ , प्रणव घाग, वाहनचालक- विद्याधन पवार या जवानांचे पथक घटनास्थळी दाखल होत बम्बच्या सहाय्याने पाण्याचा फवा-याचा मारा सातत्याने करुन आग विझविण्यात यश प्राप्त केले. या घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नाही. टेम्पो चालकाने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला. पण टेंम्पोचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीसांनी पंचनामा केला असून नुकसानीचा आकडा समजु शकला नाही. या जळीत प्रकरणाचा अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.









