१० ते १३ मे रोजी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित
खेड(प्रतिनिधी)खेड तालुका बौध्द समाज सेवा संघ शाखा क्र. ९ मोरवंडे स्थानिक शाखा, बौध्द मंडळ मुंबई, सुजाता महिला मंडळ, सिध्दार्थ तरुण मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुध्द, छन्त्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव व बुध्दविहार उद्घाटन सोहळा १० ते १३ मे या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आला असून विविध कार्यक्रम
पार पडणार आहेत
१० मे २०२५ रोजी दुपारी ३.०० वा. : बुध्दमुर्ती स्वागत रॅली . डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, खेड ते मोरवडे ११ मे रोजी सकाळी ९.०० वा. धम्म ध्वजारोहन ११ वा बौद्ध विहार उद्धाटन भन्ते महाथेरो आयानशील किर्ती यांच्या हस्ते ,११.३० बुद्ध मूर्ती स्थापना त्यानंतर धम्मदेसना , स्नेह भोजन,मान्यवरांचे स्वागत व सभा
१२ मे रोजी धम्म ध्वजारोहण , बुद्ध पूजा पाठ , धम्म प्रवचन , स्नेह भोजन, विध्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम व गुण गौरव
१३ मे रोजी धम्म ध्वजारोहण बुद्ध पूजा पाठ सकाळी ११ ते १ जाहीर सभा वंचीत बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अद्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
स्नेहभोजन , महिलांचे विविध कार्यक्रम स्नेह भोजन, रात्रौ ठिक १०.०० वा. बुध्द-भिम गितांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
गायिका : धम्मदिक्षा लातूरकर आणि पार्टी, यवतमाळ
गायक : मनोजराजे घोसावी आणि पार्टी, नागपूर
या महोत्सवात तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे







