“फिर एक बार मोदी सरकार” हे जनतेचे आशीर्वाद मिळतील
९ वर्षात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना यशस्वीपणे पोहोचल्या आणि अमलात आल्या
काँग्रेसच्या सत्ता काळात भारत देशाची डागाळलेली प्रतिमा मोदींनी बदलली
मोदी @ ९ अभियानांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्याची घोषणा
संतोष राऊळ (कणकवली ) पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या ९ वर्षात भारत देशाने सुवर्णकाळ अमूभवला आहे. काँग्रेसच्या सत्ता काळात भारत देशाची डागाळलेली प्रतिमा बदलून महासत्तेकडे वाटचाल करणारा देश अशी नवी ओळख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निर्माण केले आहे. सक्षम आणि मजबूत नेतृत्व म्हणून प्रत्येक भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विश्वासाने पाहत आहे.त्यामुळे जनता “फिर एक बार मोदी सरकार” असा आशीर्वाद देईल. असा विश्वास भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मोदी @९ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक महिन्याच्या कालावधीत विविध उपक्रम, योजनांची माहिती सभा बैठका आणि वेगवेगळ्या घटकांची संपर्क असे कार्यक्रम मोदी @ ९ अभियाना अंतर्गत घेतले जाणार आहेत. त्या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत स्थानिक आमदार नितेश राणे बोलत होते. प्रहार भवन येथे आयोजित या पत्रकार परिषदेला माजी खासदार निलेश राणे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला भाजपच्या अध्यक्ष संध्या तेरसे,जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चाचे आनंद शिरवलकर माजी सभापती दिलीप तळेकर, आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोदी @ ९ अभियाना संयोजक आहेत तर माजी आमदार प्रमोद जठार हे सहसंयोजक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महिनाभर वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
भारताची प्रतिमा आज जगामध्ये महासत्ताच्या दिशेने जाणारा देश,संकटकाळात विविध देशांना मदत करणारा देश अशी नवीन ओळख तयार केली आहे.काँग्रेसच्या काळात देशाची प्रतिमा डागाळली होती.भ्रष्टाचाराने बरबटलेला देश अशी तेव्हा ओळख होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही ओळख पुसून टाकली. आणि महासत्तेकडे चालणारा विकसनशील देश म्हणून नवीन ओळख केली.शेतकऱ्यांसाठी,महिलांसाठी,बेरोजगारांना त्यांचा मान देणं,सन्मान देणं हे या सरकारने केलं.काँग्रेस सरकारच्या काळात योजना जाहीर व्हायच्या पण त्या योजनांचा पैसा लालफितीत अडकून पडायचा. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनाच पोहोचायचं नाही मात्र मोदी सरकारमध्ये प्रत्येक योजना तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत जाते आणि त्याचा खरा फायदा त्या लाभार्थ्याला मिळतो आहे हा गेला नऊ वर्षात झालेला फरक आहे. देशभरात आर्थिक समृद्धी दारात आणण्याचे काम मोदी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. २०१४ च्या अगोदर रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो मच्छीमारां कडून योजनांसाठी चुकून एकदा प्रस्ताव यायचा. आज मच्छीमार शेतकऱ्यांच्या अनेक योजना आणि लाभाच्या योजना त्यांना मिळत आहेत त्यांची प्रस्ताव मंजूर होत आहे.
मोदी सरकारमध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली त्यात मुंबई गोवा महामार्गाचे काम रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जलद गतीने काम पूर्ण झाले.त्यामुळे मोठया संख्येने पर्यटक येऊ शकले. दळणवळणाची दर्जेदार साधने तयार झाली. मुद्रा योजना,पंतप्रधान आवास योजनाचे मोठया संख्येने देशात लाभार्थी झाले आहेत. कोकणात आणि सिंधुदुर्गातही अनेक लाभार्थ्यांना हक्काचे घर या योजनेतून मिळालेल्या आहे. अनेकांनी मुद्रा योजनेचा फायदा घेऊन रोजगारही उभे केलेले आहेत.सबका साथ सबका विकास ही घोषणा खऱ्या अर्थाने अमलात आणलेली आहे. अनेक धार्मिक स्थळांचा मोदी सरकारने विकास केला पर्यटन दृष्ट्या ही धार्मिक स्थळे विकसित केली.”ना खाऊंगा ना खाणे दुंगा” अशी घोषणा करून देशात मोदींनी भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.
कोरोना काळात विविध देश संघर्ष करत होते तेव्हा किरोना लास तयार करून ती इतर देशात पाठवून भारत देशाला सन्मान मिळवून दिला.
अमेरिकेचे अध्यक्ष मोदींचा ऑटोग्राफ घेण्यासाठी पुढे आले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान त्यांना बॉस म्हणतात अनेक देशाच्या पंतप्रधानांनी मोदीजींना सन्मानित केलेले आहे यातूनच आपल्या देशाची जगभरात निर्माण केलेले प्रतिमा डोळ्यासमोर येते.गेल्या ९ वर्षात भारताला खऱ्या अर्थाने महासत्ते कडे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे सुरू आहे.
महाराष्ट्र राज्याला केंद्रात काँग्रेसची सत्ता होती तेव्हा तुच्छतेची सापतज्ञपणाची वागणूक मिळायची. मात्र गेल्या ९ वर्षात महाराष्ट्राने जे काही मागितलं त्याच्या दुप्पट देण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झालं आहे.ग्रामीण भागाचा मोठा विकास या ९ वर्षाच्या काळात झाला आहे.
यापूर्वी देशात रेल्वेचे अपघात आणि रेल्वेची तिकीट वाढ हेच आपल्याला माहीत असायचे मात्र गेल्या ९ वर्षात रेल्वेचा विकास तर झालाच.पण विविध योजना अंतर्गत, वंदे भारत ट्रेन, मेट्रोचे जाळे,तेजस रेल्वे, बुलेट ट्रेन, पर्यटन दृष्ट्या विकसित रेल्वे आज आपल्या भारतीय रेल्वे संदर्भात वेगळं कौतुक ऐकायला मिळतं आहे.सक्षम आणि मजबूत नेतृत्व म्हणून प्रत्येक भारतीय मोदींकडे विश्वासाने पाहत आहे. जनता फिर एक बार मोदी सरकार असा आशीर्वाद देईल. असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
बॉक्स
विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याला गांभीर्याने घेऊ नका कारण ते प्रयोग नेहमी फसतात;निलेश राणे
विरोधी पक्ष एकत्र आले तरी २०२४ ला त्याचा काही फरक पडणार नाही. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे केंद्रासाठी नेहमी आघाडी करतात पण काही होत नाही.काँग्रेस मध्ये केंद्रीयमंत्री असताना ही पवारांनी असा प्रयोग केला होता.विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याला गांभीर्याने घेऊ नका. कारण ते प्रयोग आहे.देशात या लोकांचे अस्थित्व काय आहे.
त्यामुळे भाजप विरोधात कितीही पक्ष एकत्र आले तरी केंद्रात हा प्रयोग यशस्वी होणार नाही. आजही गावागावात प्रभाव मोदींनाच आहे. आजपर्यंत काश्मीर मध्ये भारताचा झेंडा लागला नव्हता.मोदींनी तो लावला. काही दंगली घडलेल्या नाहीत.नितीश कुमार, ममता बॅनर्जी,शरद पवार साहेब हे केंद्रातील नेते होवू शकत नाही. त्यामुळें विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयोग हा प्रयोगच राहील. असा टोला माझी खासदार निलेश राणे यांनी लगावला.












