Solapur: Murderous attack on a young man in the Martyrdom Chowk
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मिरवणुकीनिमित्त हुतात्मा चौकात बुधवारी रात्री 11 वाजता एका तरुणावर खुनी हल्ला झाला.
केतन विजय माने (वय-23, रा. हत्तुरे वस्ती, विमानतळ, सोलापूर) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जखमी केतन माने हा तरुण हुतात्मा चौकात थांबला होता. हुत्तमा चौकात मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहतूक कोंडी होती. ऋषी हराळे, प्रवीण हराळे, विशाल खिलारी, समर्थ जाधव यांनी केतनवर विनाकारण हल्ला केल्याची नोंद नागरी चौकीच्या एमएलसी रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागला असून त्याचे डोके रक्ताने माखले होते. त्याला त्याचा भाऊ शुभम याने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सरकारी रुग्णालयात एकच गर्दी
पार्क चौकात ही घटना घडताच घडलेल्या प्रकाराची कोणालाच कल्पना नसल्याने हा खून असल्याची अफवा पसरली. जखमी केतनला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर शासकीय रुग्णालयात गर्दी झाली होती. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलीस करत आहेत.











