या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
शिरगाव( प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील चौ-याऐशी खेड्याचा अधिपती व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा रविवार ११ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी८ वाजता श्री देव सिद्धेश्वर मंदिरामध्ये व श्रीदेवी मंदिरामध्ये लघुरुद्र व बारा स्थळातील देवदेवतावर अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती,दुपारी १ वाजता महाप्रसाद,दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, रात्री ८ वाजता स्थानिक सुस्वर भजने,रात्री १० वाजता दशावतार नाटक,नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार नाट्य मंडळ मळगाव सावंतवाडी यांच्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात येणार आहे
तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसाद व तीर्थप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी,बारा पाच मानकरी व ग्रामस्थ मंडळींनी कळविले आहे












