*दापोली प्रतिनिधी* :- तालुक्यातील दाभोळ बंदरामध्ये अचानक बंदर खात्याचा सायरन वाजला आणि येथे मच्छीविक्री करणाऱ्या महीला खरेदी करणारे नागरिकांची एकच धावपळ उडाली. सर्व ग्रामस्थांना खात्यामार्फत अलर्ट करण्यात आलं होतं. तेवढ्यात कळलं की सध्या सीमेवर चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि याठिकाणी शत्रूकडून कोणतीही कारवाई झाली तशी परिस्थिती निर्माण झाल्यावर नागरिकांनी व यंत्रणेने काय करायचे? याच प्रात्यक्षिक येथे दाभोळ बंदरात घेण्यात आले.
यात धोक्याच्या परिस्थितीचं नाट्य रुपांतर याठिकाणी करण्यात आलं होतं. आपत्कालिन परिस्थितीत नागरिकांनी याला कशी प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे? याचा सराव याठिकाणी करण्यात आला. दरम्यान यावेळी कुठेतरी आग लागली, दहशतवादी हल्ला झाला तर येथील ग्रामस्थांना अशा परिस्थितीत सुरक्षित बाहेर काढणं आणि मदतकार्य पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया याठिकाणी दाखवण्यात आली.
यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि बचाव टीम यांनी तत्परतेने सर्व कामगिरी बजावली. सुरक्षा उपकरण आणि अलर्ट प्रणाली योग्य पद्धतीने काम करत होती.
मॉकड्रिलसाठी ठरलेल्या वेळेनुसार सायरन वाजवला आणि लोकांना परिस्थिती विषयी सूचना दिल्या गेल्या. मॉकड्रीलच्या ठिकाणी असलेल्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना एका जवळपास असलेल्या इमारतीमध्ये हलवण्यात आलं. फायर ब्रिगेड, पोलीस आणि मेडिकल टीम, महसूल विभाग , होमगार्ड टीम, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी, बंदरविभाग घटनास्थळी पोहोचले होते. या मॉकड्रिलमध्ये ग्रामस्थांनी बहुसंख्येने सहभाग घेतला होता. सद्यस्थितीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर त्याचा सराव यंत्रणेला देखील असणे गरजेचे आहे त्याप्रमाणे जखमींना हलवणे, अपंग व्यक्तींना, ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवले. नौकेवर जखमी व्यक्तीला देखील स्पीड बोटीने आणण्यात आले, जखमींना अँबुलन्स मधून हलविण्यात आले.
यावेळी दापोलीचे प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी यांनी अशा युध्दजन्य परिस्थितीच्या वेळी नागरिकांनी काय करायला पाहिजे ? याच्या सूचना उपस्थित नागरिकांना समजावून सांगितल्या.
_________________________________________
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रात्यक्षिक घेण्यात आलं. दाभोळ हे ऐतिहासिक आणि महत्त्वाचे बंदर आहे. पलीकडे आरजीपीएलकंपनी आहे. त्यामुळे हा सगळा परिसर संवेदनशील परिसर आहे. म्हणून या गावाची निवड मॉकड्रिलसाठी करण्यात आली होती. गरोदर महिला ज्येष्ठ नागरिक यांना आपत्कालीन परिस्थिती कसं रेस्क्यू करायचं याच प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. या मॉकड्रिलसाठी दाभोळ येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आणि आता कोणत्याही परिस्थितीत आम्ही येणाऱ्या युध्दजन्य परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज आहोत जय हिंद; अशी प्रतिक्रिया तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली
_________________________________________












