हर्णे शाळेची सृष्टी चौधरी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत 7 वी
दापोली | प्रतिनिधी: नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत दापोली तालुक्यातून इयत्ता पाचवीसाठी 28 व आठवीसाठी 20 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी इयत्ता पाचवी मध्ये 20 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळाचे आठवीमध्ये 4 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा चे निवड झाली आहे इयत्ता पाचवी मध्ये हर्णे मराठी शाळेची विद्यार्थीनी सृष्टी चौधरी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत 7वी आली असून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच आठवीसाठी मळे व बोरिवली या दोनच जिल्हापरिषद शाळात वर्ग असून त्या दोन्ही शाळातून 4 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत
हा व्हिजन दापोलीचा इफेक्ट असून सर्वांनी त्यासाठी गेल्या वर्षभरात घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, पर्यवेक्षिय यंत्रणेतील सर्व अधिकारी व्हिजन दापोली समितीची सर्व टीम, पंचायत समितीचे प्रशासक तथा मार्गदर्शक मा. गटविकास अधिकारी यांचे शिक्षण विभाग दापोली यांच्याकडून
गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी अभिनंदन केले.












