वैभववाडी | प्रतिनिधी : कोकिसरे येथील शिवाजी महाराज ग्रुप च्या वतीने बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. गावातील विद्यार्थिनी संपदा यशवंत पुजारी हिने ९३.५० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच श्रेया देवजी पालकर ९१.१७ टक्के गुण मिळवले, संचित मिलिंद जाधव ७१.१७ टक्के गुण मिळवले. या तिघांचा उज्वल यश संपादन केल्याबद्दल गावच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभववाडी भाजपा महिला अध्यक्ष प्राची तावडे, सरपंच प्रदीप नारकर, भानुदास तावडे, सुनील गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत नेवरेकर, अवधूत नारकर, प्रमोद जाधव, दत्ता सावंत, परेश सावंत, बाळा वाडेकर, राजन मोरे, दिलीप मोरे, मधुकर जाधव, बबन पुजारी, देवजी पालकर, भाई पुजारी, राजा गायकवाड व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास प्रभू यांनी केले.












