राजापूर | प्रतिनिधी:- शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर कोदवली विभागातील धोपेश्वर खांबलवाडी येथील उ. बा. ठा. गटातील अनेक शिवसैनिकांनी आमदार राजन साळवी व उद्योजक आर. डी. तथा आण्णा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यामध्ये प्रवश कर्त्यांमदये सुभाष खांबल – गावकर, पुरुषोत्तम भानू खांबल – युवासेना उपतालुका अधिकारी, पर्शुराम हरी खांबल – उपशाखाप्रमुख, विकास केशव बापार्डेकर – युवाशाखाअधिकारी, गजानन अशोक खांबल – युवा उपशाखा अधिकारी तसेच कोदवली तरळवाडी मांडवेवाडी मांडवकरवाडी येथील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक रमेश पुनाजी गोडांबे – उपविभाग प्रमुख माजी सरपंच विद्यमान सदस्य, जयवंत मांडवकर, सुरेश पाडावे, आत्माराम मासये, सुनील कुंबडेकर, संतोष मांडवे, नारायण मांडवे – माजी शाखाप्रमुख तसेच सर्व वाड्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख अशपाक हाजू, माजी नगरसेवक सौरभ खडपे, माजी सभापती सुभाष गुरव, जितेंद्र तुळसवडेकर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.











