बामणोली येथील व्यसन मुक्त रघुनाथ कुळे यांचा मंडळाने केला सन्मान
संतोष कुळे lचिपळूण : एखाद्याला लागलेल्या व्यसनाची सवय सोडवण्यासाठी आणि त्याला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्याच्या कुटुंबातील लोक खूप प्रयत्न करतात . डॉक्टर, वैद्य आणि भगत अशा ठिकाणी व्यसनाधीन व्यक्तीला नेतात. मात्र तरी त्याचे व्यसनापासून सुटका मिळत नाही. पण व्यसनाधीन व्यक्तीने स्वतःच निर्धार केला तर ते शक्य आहे हे बामणोली डिंगणकरवाडी येथील रघुनाथ गोपाळ कुळे यांनी दाखवून दिले आहे. त्याबद्दल नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी मंडळांने त्यांचा आणि मंडळासाठी नेहमीच तत्पर असणारे रुपेश पावसकर यांचा ही सन्मान करून त्याचे कौतुक केले आहे.
व्यसन म्हणजे आयुष्याला लागलेली एक कीड आहे . मग ते व्यसन दारूचे असो, गुटखा असो की दुसरे कुठलेही असो. व्यसन हे व्यसनच असते. व्यसनामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किंवा कुटुंब उद्ध्वस्त होत असते. अशी अनेक उदाहरणे आपण समाजामध्ये नेहमीच पाहत असतो मात्र अशा व्यसनापासून मुक्तता किंवा सुटका मिळवण्यासाठी काही कुटुंबातील व्यक्ती प्रयत्न करीत असतात. एखाद्याच्या पतीला जर व्यसन असेल तर त्याची पत्नी आपल्या नवऱ्याला त्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी बरेच प्रयत्न करते. मात्र तरीही यश आले नाही तर मात्र कुटुंब हताश होते. परंतु असे व्यसन सोडवण्यासाठी काही वेळा भगतगिरी करणाऱ्याकडे जाण्याची संख्या वाढते. किंवा एखाद्या वैद्य असेल तर यांच्याकडून सुद्धा उपचार घेतले जातात. मात्र तरीसुद्धा व्यसन सुटत नाही. अशावेळी मात्र सर्व प्रयत्न संपलेले असतात . परंतु जर व्यसनी असणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या मनाशी निर्धार केला की, मला या व्यसनापासून मुक्त व्हायचं आहे तर मात्र ते शक्य होते. अशीच एक घटना चिपळूण तालुक्यातील बामणोली डिंगणकरवाडी येथे घडली आहे. याच वाडीत राहणारे रघुनाथ कुळे हे व्यसनाच्या आहारी होते . मात्र त्यांनी स्वतःच्या मनाशी ठाम निर्धार केला की मला यातून मुक्त व्हायचं आणि माझा कुटुंबाला नव्याने आधार देत सुखाचे दिवस दाखवायचे आहे. यावेळी मात्र त्यांनी कुठल्याही डॉक्टर, वैद्य, किंवा भक्ताकडे न जाता मनाचा निर्धार केला आणि व्यसनापासून सुटका करून घेतली. गेली पाच वर्षे ही व्यक्ती व्यसनमुक्त जीवन जगत आहे. या घटनेबाबत नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी या मंडळाने आपला मंडळाचा सदस्य रघुनाथ कुळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करत ६ मे रोजी झालेल्या सन्मान सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष राजाराम घाणेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला.
श्री. कुळे यांनी इतरांना व्यसनापासून मुक्त होण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे. सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. इतरांनी सुद्धा असाच मनाचा निर्धार करून व्यसनापासून मुक्त व्हावे असे यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजाराम घाणेकर यांनी सांगितले.











