वाटद-खंडाळा येथे दारूच्या नशेत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातल वाटद-खंडाळा येथील युवकाने दारुच्या नशेत आपल्याच मालकीच्या आंबा-काजू बागेत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 12 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली.
निखिल मंगेश कदम (19,रा.बौध्दवाडी वरची निवेंडी,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. मंगळवार 12 ऑगस्ट रोजी त्याने दारुच्या नशेत म्हैसकोंड तळेपाटवाडी,वरची निवेंडी येथील आपल्या मालकीच्या आंबा-काजू बागेत काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे नेले असता तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी निखिलला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे