पाल सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी कमलेश गावडे यांची निवड

वेंगुर्ले l दाजी नाईक :पाल विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली. पाल या संस्थेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ निवडण्यात आले. सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. कमलेश विलास गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कमलेश गावडे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे जवळचे विश्वासू साथीदार आज चेअरमन झाल्याने त्याचा फायदा पाल विकास सोसायटी ला होणार आहे.

सोसायटीच्या निवडलेल्या संचालक मंडळामध्ये चेअरमन पदी श्री. कमलेश विलास गावडे, चेअरमन व्हाईस श्री प्रभाकर विष्णू गावडे तर संचालक म्हणून श्री विलास अनंत गावडे, श्री. दिलिप दत्तात्रय राणे, श्री. कृष्णा भिकाजी गावडे, श्री. संजय दाजी पालकर, श्री. दीपक नारायण गावडे, श्री. राजन सावळाराम गावडे, श्री. वासुदेव पुरुषोत्तम बर्वे आणि सेक्रेटरी सिद्धेश विजय गावडे यांचा समावेश आहे.