प्रशालेच्या १९९३-९४ च्या बॅचचा अनोखा उपक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेजच्या गरजू व होतकरू विद्यार्थीनींना प्रशालेच्या १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे मोफत गणवेश वाटप करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांसह मुंबई येथील आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक गावडे आणि त्यांचे शालेय जीवनातील सहकारी सुनिल नाईक, संजय सावंत व सुरेश गवस यांच्या तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष पद्मराज मुणगेकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी माजी विद्यार्थी किरण पालव, संदिप सामंत, नारायण घाटकर, शाळेचे प्राचार्य धोंड सर, पर्यवेक्षक साळगावकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री धोंड सर यांनी याबद्दल आभार व्यक्त केले.












