पर्यायी मार्ग वाहून गेला, दहिबांव नारींग्रे गावचा संपर्क तुटला
फणसगाव कुवळे येथे घरांवर झाडे पडून सुमारे ६० हजारांचे नुकसान
देवगड : प्रतिनिधी
सलग तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातला असून तालुक्यात झाडे घरावर पडून घरांची पडझड झाली असून सुमारे ६० हजाराचे नुकसान झाले आहे.तीन दिवसात पावसाने दोनशेचा आकडा पार केला असून शुक्रवारी १०६ मिमी पावसाची नोंद झाली.संततधार पावसाने दहिबांव नारींग्रे पुलाचे काम सुरू असल्याने या दोन गावांतील नागरिकांसाठी काढण्यात आलेल्या पर्यायी मार्ग पाण्याने वाहून गेला असून दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.
देवगड तालुक्यात सलग तीन दिवस वादळी वाèयासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून घरांची पडझड होवून सुमारे ६० हजाराचे नुकसान झाले आहे.२३ मे रोजी सकाळी ६ वा.सुमारास फणसगाव येथील शुभलक्ष्मी काशीराम आडीवरेकर यांच्या घराच्या पडवीवर आंब्याचे झाड पडून सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले तर २२ मे रोजी पहाटे २.३० वाजता कुवळे घाडीवाडी येथील सखाराम बाळकृष्ण घाडी यांच्या घरावर माडाचे झाड पडून सुमारे ८७५० रूपयाचे नुकसान झाले आहे.
तालुक्यात सलग तीन दिवस धुव्वाधार पाऊस बरसत असून तिसèया दिवशी १०६ मिमी पावसाची नोंद झाली तर तीन दिवसात एकूण २२५ मिमी पावसाची नोंद झाली.गेले दोन महिन्यापासुन दहिबांव नारींग्रे नवीन पुलाचे काम सुरू आहे यामुळे या दोन गावातील नागरिकांसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला होता मुसळधार पावसाने पाणी गेल्याने हा मार्ग वाहून गेला असून दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.












