रत्नागिरी :
20-21-22-23 मे 2025 रोजी झालेल्या वादळी वारा व पाऊस यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा बाधित आहे. पोल पडणे, वीज यंत्रणेवर झाड पडणे आदी कारणामुळे हा पुरवठा बाधित आहे.
ग्राहकांचा वीज पुरवठा लवकर सुरु करण्याकरता महावितरण कर्मचारी व अधिकारी अथक परिश्रम घेत, अहोरात्र शिफ्टमध्ये काम करत आहेत. तरी वीज ग्राहकांनी महावितरण ला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
वीज ग्राहक अधिक माहिती करिता व आपल्या तक्रारी नोंदवण्या करिता 1912 , 18002333435 व 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
तसेच जिल्ह्यातील बाधित वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने पुढील माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
(एकूण बाधित / एकूण पूर्ववत)
बाधित उपकेंद्रे – 18/18
बाधित उच्चदाब वाहिन्या – 103/101
पडलेले लघुदाब पोल – 116/57
पडलेले उच्चदाब पोल – 61/22
बाधित रोहित्रे – 5575/5522
प्रभावित गावे – 1153/1142
प्रभावित ग्राहक – 336093/ 331717
महावितरणचे अंदाजित नुकसान – 39 लाख
(नवीन माहिती उपलब्ध होईल तसे या आकडेवारीत बदल अपेक्षित) असे जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) महावितरण यांनी कळवले आहे.









