आबलोली (वार्ताहर) :
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीचे माजी सरपंच तसेच वरची पागडेवाडी विकास मंडळ आबलोली या मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक, माजी सरपंच तुकाराम पागडे यांचे नुकतेच हृदयविकाराचा तीव्र धक्याने वयाच्या ६५ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने आबलोली पंचक्रोशीसह संपूर्ण गुहागर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कै. तुकाराम पागडे यांनी कोरोना काळात सरपंच म्हणून केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे.कै.तुकाराम पागडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, मुलगी, जावई,भाऊ, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचे सातवे गुरुवार दिनांक २२ मे २०२५ रोजी झाले असून रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी दशक्रिया व बारावे विधी होणार आहे.












