रत्नागिरी ः प्रतिनिधी
रेल्वेप्रवासादरम्यान प्रवाशाच्या झोपेचा फायदा उठवत अज्ञाताने 78 हजारांचा लॅपटॉप लांबवला. ही घटना शनिवार 24 मे रोजी मध्यरात्री 1.30 ते सकाळी 6.30 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत प्रवासी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ही महिला मडगाव रेल्वेस्टेशन ते रत्नागिरी रेल्वेस्टेशन असा त्रिवेंद्रम नॉर्थ-योगनगरी ॠषीकेश एक्सप्रेसने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान ती झोपी गेली असल्याचा फायदा उठवत अज्ञाताने तिचा लॅपटॉप असलेली सॅकबॅग लांबवली. शनिवारी सकाळी 6.30 वा. सुमारास तिला रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान जाग आली असता आपली बॅग चोरीस गेल्याचे तिच्या लक्षात आले. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.












