रत्नागिरी: प्रतिनिधी
शहरातील परटवणे येथे गांजा सदृश्य अमली पदार्थ सेवन करणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 24 मे रोजी सायंकाळी 7.30 वा. सुमारास करण्यात आली.
रोहित राजेंद्र चव्हाण (35,मुळ रा.आंबेशेत न्हावीवाडी सध्या रा.कालीका नगर मिरजोळे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल अमित पालवे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,शनिवारी सायंकाळी संशयित हा परटवणे येथे बंद टपरीच्या आडोशाला काळोखात गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात एन.डी.पी.एस अॅक्ट 1985 चे कलम 8 (क),27 प्रमाणेग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












