मुरुड येथे तिघांची शिवीगाळ करत दाम्प्त्याला मारहाण

दापोली l प्रतिनिधी :दापोली तालुक्यातील मुरुड येथे अज्ञात कारणातून दाम्प्त्याला शिवीगाळ करत तीन जणांनी मारहाण केली. ही घटना शनिवार 24 मे रोजी सकाळी 11.40 वा. सुमारास घडली. संशयितांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञानी विष्णू वाडेकर, चैताली अज्ञानी वाडेकर आणि अतुल सावंत (सर्व रा.मुरुड,दापोली,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पिडीत विवाहितेने दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी फिर्यादीच्या घराची खिडकी दुरुस्त करण्यासाठी कामगार आले होते. तेव्हा तीन्ही संशयितांनी फिर्यादीच्या घरात घूसून फिर्यादी महिला आणि तिच्या पतीला घरातून बाहेर जाण्यास अटकाव केला. तसेच फिर्यादी व तिच्या पतीला हातांच्या थापटांनी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली.