खेडमध्ये सलग ६ व्या दिवशी तुफान पाऊस 

rain flows down from a roof down

 

खेड(प्रतिनिधी)

खेड तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला गेल्या ६ दिवसा पासून झोडपून काढले आहे रविवारी सकाळी तूफान पावसाने दैनंदिन जीवन कोलमडून गेले असून ग्रामीण भागात नदी नाले ऐन मे महिन्यात च दुथड्या भरुन वाहू लागले आहेत.

६ दिवसा पासून पडत असलेल्या पावसाचा जोर तालुक्यात कायम आहे पहिल्या पावसाने ऐन मे महिन्यात च नद्यांच्या पात्रात वाढ झाली तर ग्रामीण भागात ओढे दुथड्या भरून वाहत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे अवकाळी पावसाने गेल्या ६ दिवसात च जन जीवन विस्कळीत केल्याने आगामी महिन्यात पाऊस किती कोसळू शकतो याचा अंदाज आता शेतकरी लावू लागले आहेत.

सद्य स्थितीत ग्रामीण भागात काही ठिकाणीं पेरणी ची कामे सुरू देखील झाली आहेत तर काही ठिकाणी पावसा मुळे अजून सुरू झालेली नाहीत.

दरम्यान रविवारी सकाळ पासून सतत धार कोसळणाऱ्या पावसाचा जोर संध्याकाळी पुन्हा वाढला होता.