लांजा | संतोष कोत्रे
पाऊस सुरू झाला तरी रखडलेले श्रीरामपूल ब्रिज चे काम आणि त्यातून उद्भवणारी परिस्थिती आणि लांजातील नागरिकांचा सुरू असलेला संताप या पार्श्वभूमीवर आज महामार्ग ठेकेदार कंपनीने युद्ध पातळीवर काम हाती घेत हा पूल वाहतुकीसाठी खला केला आहे आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजता हा पूल वाहतूकीसाठी सुरू झाला आहे .
लांजा शहरातील मुंबई गोवा महामार्गावर श्रीराम मंदिरासमोरील वहाळावरील श्रीराम पुलाचे काम मे महिन्यात हाती घेण्यात आले होते. मात्र काही दिवस हे काम संथगतीने सुरू असल्याने पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी अडचणीचा ठरला होता.त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि येथील पाणी येथील नागरिकां च्या घरात घुसत होते त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात होता .लांजावासीयातून ठेकेदार कंपनीच्या कामाबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला होता .
लोकांची ही होणारी गैरसोय लक्षात घेऊन काल सोमवारी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी देखील लांजा लांजा शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. तसेच आमदार किरण सामंत यांनी देखील महामार्ग ठेकेदार कंपनी आणि बांधकाम विभाग यांना तातडीच्या सूचना दिल्या होत्या .
या पार्श्वभूमीवर अखेर महामार्ग ठेकेदार कंपनीने लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन युद्ध पातळीवर काम हाती घेत महामार्गावर नव्याने बांधण्यात आलेला श्रीरामपूल वाहतुकीसाठी खुला केला .आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर या नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे.












