KANKAVLI: लोरे नं.१ मधील १९ जणांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया

Free eye surgery on 19 people in Lore No.1

भारतीय जनता पार्टी लोरे नं.१ आणि S.S.P.M लाईफटाईम हॉस्पिटल चा उपक्रम

कणकवली : भारतीय जनता पार्टी लोरे नं.१ आणि S.S.P.M लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमानाने १९ जणांवर मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. वसंत भिकाजी गुरव,बाळकृष्ण शंकर गुरव, सुरेश आत्माराम शिरोडकर ,प्रकाश अर्जुन नारकर ,मुरलीधर धाकू राणे ,सूर्यकांत सिताराम मोरे, वामन सिताराम तेली, आनंदी रघुनाथ तेली, सुवर्ण गणपत तेली ,शेवंती अनंत तेली, शुभांगी चंद्रकांत शिवगण ,राजश्री बाबु गुरव, चंद्रशेखर अनंतराव राणे ,मधुकर रामचंद्र गुरव ,शांताराम गणपत परब, द्रोपदी मनोहर गुरव ,सुजाता सुरेश गुरव, बाबू दाजी राणे यांचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस श्री मनोज रावराणे,माजी उपसभापती श्री.तुळशीदास रावराणे, लोरे सरपंच – श्री अजय रावराणे, उपसरपंच श्री. सुमन गुरव,ग्रा.पं.सदस्य नरेश गुरव,सुनील रावराणे,प्रकाश रावराणे व ग्रामस्थ उपस्थित होते.