२८ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २८८ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी पावसाचे प्रमाण ३६ मिमी इतके होते. यामध्ये वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १०२ मिमी पावसाची नोंद झाली, तर देवगड तालुक्यात ७० मिमी पाऊस पडला. मालवणमध्ये २९ मिमी, कणकवलीत २५ मिमी, वेंगुर्ल्यात १९ मिमी, सावंतवाडी व कुडाळ या दोन्ही तालुक्यांमध्ये १६ मिमी आणि दोडामार्ग तालुक्यात ११ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील पावसाचा जोर काही भागांत अधिक जाणवला असून, शेतकरी वर्गासह स्थानिक नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.












