चौपदरीकरणानंतर घाटा मधील वळण डेंजर अवस्थेत,
खेड (प्रतिनिधी)सध्या पावसाळा कालावधीमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील धोकादायक वळणावर वळणावर डेंजर स्पॉटचे सौंदर्य खुलले आहे. मात्र या अपघाती वळणाचा धोका कायम असून हे ठिकाण अपघाताच्या दृष्टीने संवेदनशील बनले आहे
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणामुळे घाटातील प्रवास सुस्साट झाला असला तरी अवघड वळण मात्र ‘डेंजरझोन’मध्येच आहे. अवघड वळणावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघात रोखण्यासाठी अवघड वळणावर १३ ठिकाणी टाकण्यात आलेले गतिरोधकही कुचकामीच ठरले आहेत. याशिवाय संरक्षक भिंतीवर करण्यात आलेला ‘टायर तंत्रज्ञाना’चा अवलंबही फोल ठरला आहे.
चौपदरीकरणापूर्वी अपघाताच्या मुंबई-गोवा महामार्गावरील दृष्टीने शापितच बनला होता. घाटात प्राणांतिक अपघातांसह छोटे-मोठे अपघात घडत होते. सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक ठप्प होऊन विलंबाच्या प्रवासाला समोर जावे लागत होते. पावसाळ्यात दरडी कोसळून वाहतुकीचा खोळंबा होत होता. खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभझाल्यानंतर ठेकाधारक कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने भोस्ते घाटातील चौपदरीकरणालाच सर्वप्रथम प्राधान्य दिले.
चौपदरीकरणानंतरही भोस्ते घाटात अपघातांची मालिका आजमितीसही कायम आहे. भोस्ते घाटातील अवघड वळणावर सातत्याने घडणारे अपघात रोखण्यासाठी तब्बल १३ ठिकाणी गतिरोधक बसवले होते. मात्र गतिरोधक बसवूनही अपघात रोखण्यात अपयशच आले आहे. याशिवाय सतत घडणाऱ्या अपघातांना लगाम घालण्यासाठी संरक्षक भिंतीवर टायर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची नवी शक्कल लढवण्यात आली. मात्र हा अवलंबही फोल ठरला आहे.










