मंत्री ना. नितेश राणे व माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, आ. रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती
राजापूर (प्रतिनिधी): आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर व संघटनात्मक बांधणीसाठी रविवारी १ जून रोजी राजापूर तालुका भाजपाच्या वतीने राजापुरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे, भाजपा कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तशी माहिती भाजपाचे पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष अॅड. एकनाथ मोंडे व पश्चिम मंडळ तालुका अध्यक्ष मोहन घुमे यांनी दिली आहे.
राजापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रविवारी दुपारी दोन वाजता हा मेळावा होणार आहे. याप्रसंगी खा. राणे , ना. नितेश राणे, आ. रविंद्र चव्हाण यांसह भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्याला भाजपाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अॅड. मोंडे व घुमे यांनी केले आहे.












