दी बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग या संघटनेच्या अध्यक्ष पदी देवगडचे शामसुंदर जाधव

देवगड/ वार्ताहर :दी बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग या संघटनेच्या अध्यक्ष पदी देवगडचे शामसुंदर जाधव यांची तर सरचिटणीस पदी कणकवलीचे अंकुश कदम यांची निवड करण्यात आली आहे.

ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतसंस्था सभागृहात शनिवारी निमंत्रक आनंद कासार्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेण्यात आली. या सभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

कार्यकारीणी पुढीलप्रमाणे

कार्याध्यक्षपदी समाज भूषण संदीप कदम – मालवण, उपाध्यक्षपदी रविंद्र जाधव – वैभववाडी, श्रीमती पर्णवी जाधव – कुडाळ, सहसचिवपदी सचिन कोर्लेकर – खारेपाटण, कोषाध्यक्षपदी मधुकर तळवणेकर – सावंतवाडी, सदस्यपदी आनंद कासार्डेकर, विद्याधर कदम, डी. के. पडेलकर, अभय पावसकर, संजय कदम, प्रा. सुषमा हरकुळकर यांची निवड करण्यात आली आहे.