श्री सत्यसाई बाबांच्या पादुकांचे व रथाचे रत्नागिरीत आगमन !

रत्नागिरी :श्री सत्यसाई बाबांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुट्टपर्ती, आंध्र प्रदेश येथून निघालेल्या रथाचे रत्नागिरीत, गुरुवार, दिनांक ०५ जून २०२५ रोजी आगमन होणार आहे.

श्री सत्यसाईबाबांचा प्रेम आणि शांतीचा संदेश घेऊन पुट्टपर्ती, आंध्रप्रदेश येथून बाबांच्या पादुका असलेले सहा रथ सर्व भारतभर दर्शनासाठी निघाले आहेत. त्यातील एक रथ गोवा राज्यात भ्रमण करुन रत्नागिरी येथे ०५ जून ते ०६ जून दरम्यान येत आहे. हा साईरथ शहरातील श्री गजानन महाराज मंदिर, पॉवर हाऊस, नाचणे रोड, येथे वास्तव्यासाठी असणार आहे. दि. ०५ जून रोजी साईरथ शहरात विविध ठिकाणी फिरणार आहे. भाविकांना यावेळी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. ०६ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. संध्याकाळी ०६ वा. प्रा. सिद्धार्थ कस्तुरीरंगन, (प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ) यांचे व्याख्यान त्यानंतर रात्रौ ०७.३० वा. भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी भाविकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीसत्यसाई सेवा समिती, रत्नागिरी तर्फे करण्यात आलेले आहे.